भाषा आणि जीवन

निमंत्रण पत्रिका

मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने, दरवर्षी ‘भाषा आणि जीवन’ हे त्रैमासिक गेल्या ३० वर्षांपासून प्रकाशित करण्यात येते. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा आणि दिवाळी असे चार अंक दरवर्षी प्रसिद्ध होत असतात. ह्या वर्षीचा म्हणजे २०१२मधील 'भाषा आणि जीवन' चा दिवाळी अंक ‘बोली विशेषांक’ म्हणून प्रकाशित होत आहे.

शनिवार, दि० १० नोव्हेंबर, २०१२ ला ह्या बोली विशेषांकाचे प्रकाशन मान्यवर लेखक आणि अभ्यासक डॉ० सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. समारंभाचे अध्यक्ष आहेत प्रा० प्र०ना० परांजपे. वेदशास्त्रोत्तेजक संस्थेच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार्‍या ह्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती आहे.

आवाहन, लेखकांसाठी सूचन, परीक्षणासाठी आलेली पुस्तके


आवाहन

टपालाने पाठविलेल्या अंकांतील काही अंक गहाळ होतात, हा नेहमीचा अनुभव आहे. शक्यतो अंक पुन्हा पाठविला जातो. पण जेव्हा या तक्रारींची संख्या जास्त असते तेव्हा अंक पुन्हा पाठवणेही कठीण होते. पुण्याच्या काही भागांतून - विशेषत: बिबवेवाडी, सिंहगड मार्ग - या भागांतून तक्रारी खूप येतात. यामुळे अंकाची प्रत व टपालखर्च असे दुहेरी नुकसान होते. म्हणून जे सभासद/वर्गणीदार/कुरियर-सेवेचे वर्षाला ` ४०/- पाठवतील त्यांना अंक कूरियर-सेवेने पाठविला जाईल. ही व्यवस्था हिवाळा २०११ (जानेवारी २०११) अंकापासून करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी.

लेखकांसाठी सूचना पुढे वाचा »

पानपूरके

भाषा प्रयोगातील दोन प्रवृत्ती
भाषाशक्तीचा आविष्कार भाषा प्रयोगात होतो तेव्हा त्यात दोन प्रवृत्ती दिसून येतात. एक प्रवृत्ती असते ती समाजजीवनातील निरनिराळी रूपे आणि अनेक विभाजने यांच्यामुळे भाषाव्यवस्थेत येणार्‍या विविधतेची, विकेंद्रीकरण होण्याची, भाषाप्रयोगात जीविकागत, प्रदेशगत आणि पिढीगत भेद निर्माण होण्याची आणि भाषांची विविधता कायम राहण्याची. याउलट दुसरी प्रवृत्ती आहे ती परिष्करणाची, प्रमाणीकरणाची, स्थिरीकरणाची, एकरूपतेची. विविध प्रकारच्या जीविका, प्रदेश, पिढ्या जोडण्याची प्रेरणा, प्रबळ केंद्र निर्माण करण्याची प्रेरणा येथे सक्रिय होताना दिसते. पुढे वाचा »

लेखक-परिचय


आचार्य, (प्रा०) माधव नारायण :
एम०ए०, मराठीचे निवृत्त प्राध्यापक. ‘अनुषंग’ (१९८१), ‘मराठी व्याकरण विवेक’ (१९९०, २००१), (महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक), ‘ज्ञानमयूरांची कविता’ (१९९३), ‘आर्याभारत : नवदर्शन’ (१९९७), ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ (२००३), ‘ध्वनितांचे केणें’ (२००८) ही पुस्तके प्रकाशित. ‘मोरोपंतांची सतीगीते’ (१९८५, १९९४), ‘मोरोपंत विरचित संशयरत्नावली (१९८५), ‘मोरोपंतकृत श्लोककेकावली’ (१९९४) या पुस्तकांचे संपादक. पैकी शेवटच्या पुस्तकास महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे पारितोषिक. ‘पञ्चपदवी ज्ञानदेवी’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासन पुरस्कार व संत साहित्य पुरस्कार. ‘ध्वनितांचे केणें’ या ग्रंथाला मराठी अभ्यास परिषदेचा पुरस्कार. पुढे वाचा »

भाषाभिमान आणि भाषाविवेक

अ०रा० यार्दी

संदर्भ : ‘भाषा आणि जीवन’चा वर्ष २८, अंक ३ पावसाळा २०१०

१) इंग्रजी शब्दांना मराठीत प्रतिशब्द देताना खूपच सूक्ष्म विचार करायला हवा. उदा० टेलिफोनला आपण दूरध्वनी / दूरभाष म्हणतो आणि मोबाईलला भ्रमणभाष / भ्रमणध्वनी म्हणतो. खरे तर टेलिफोनला ‘स्थिरभाष’ म्हणायला काय हरकत आहे? लँडलाइनचा अर्थ तो घरात. एका ठिकाणी, जागा निश्चित केलेल्या ठिकाणी ठेवलेला असतो. ‘भ्रमणभाष’ हा शब्द भ्रमण करता करता, बोलता येण्याची सोय असलेला या अर्थाने ठीक आहे. पण तो शब्द ध्वनीपेक्षा वस्तूला अधिक लागू होतो. काही लोक मोबाईलला ‘चलभाष’ असाही शब्द वापरतात. म्हणजे याच आधाराने टेलिफोनला ‘अचलभाष’ म्हणायचे काय? पुढे वाचा »

संयुक्त क्रियापदांचा पेच

चिन्मय धारूरकर

‘भाषा आणि जीवन’च्या वर्ष २८, अंक १ हिवाळा २०१० या अंकात रेणुका ओझरकर यांचा ‘‘मराठीतील ‘विवाद्य’ संयुक्त क्रियापदे’’ या शीर्षकाचा लेख आला आहे. या लेखात त्यांनी उमाकांत कामतांच्या एका लेखाचा उत्तम समाचार घेतला आहे आणि मुद्देसूदपणे कामतांच्या म्हणण्याचे खंडन केले आहे.

संयुक्त क्रियापदांची विवाद्यता ही भाषागत नसून सैद्धान्तिक अव्यवस्थेतून निपजते हे रेणुका ओझरकरांचे म्हणणे त्यांच्या संशोधनातील सैद्धान्तिक चौकटीबद्दलची जाण दाखवणारेच आहे. पुढे वाचा »

अभ्यासकांसाठी मोलाचे भाषांतर

म०के० ढवळीकर

(परीक्षित पुस्तक : भारतीय लेखविद्या, दिनेशचंद्र सरकार. मराठी भाषांतर : डॉ० शोभना गोखले. काँटिनेंटल प्रकाशन, पुणे. पृ० ४७८ + चित्रे. किंमत दिलेली नाही.)

प्रा० (कै०) दिनेशचंद्र सरकार हे जगविख्यात भारतीय पुरालिपी तज्ज्ञ होते. ते निष्णात संस्कृत पंडितही होते. काही काळ ते कोलकाता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयाचे प्राध्यापक होते. नंतर त्यांनी अनेक वर्षे भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्यात प्रमुख लिपितज्ज्ञ म्हणून काम केले. ‘पिग्राफिया इंद्रिकाए’ हे त्या खात्याचे मुखपत्र, त्याचे ते संपादक होते. त्याच्या प्रत्येक अंकात बहुसंख्य लेख डॉ० सरकारांचे असत. त्यामुळे काही विद्वान त्याला ‘एपिग्राफिया सरकारीका’ म्हणत असत.) पुढे वाचा »

राज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे

प्रकाश परब

नवीन मराठी शाळांना परवानगी नाकारून आणि शासनमान्य नसलेल्या प्रयोगशील मराठी शाळांना टाळे लावण्याची धमकी देऊन महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना अभूतपूर्व अशी आदरांजली वाहिली आहे. मराठी शाळांबाबत पारतंत्र्याच्या काळातील ब्रिटिश सरकारलाही लाजवणारे धोरण स्वीकारून राज्य सरकारने साडेदहा कोटी महाराष्ट्रीय जनतेचा अपमान केला आहे. पुढे वाचा »

हिपटुल्ला

सआदत हसन मंटो

“श्यामनं या पत्रात ‘हिपटुल्ला’ असा एक शब्दप्रयोग वापरला आहे. त्याचा अर्थ स्पष्ट करणं मनोरंजक आहे.”
मी बॉम्बे टॉकीजमध्ये नोकरीला होतो. त्या दिवसांत कमाल अमरोहीच्या ‘हवेली’ या चित्रपटकथेविषयी बोलणं सुरू होतं. (या कथेवरील चित्रपट ‘महल’ या नावानं नंतर प्रदर्शित झाला...)
सर्वसाधारण गप्पागोष्टीत वाङ्मयीन शब्दप्रयोग करण्याची कमाल अमरोहीला सवय आहे. माझ्यासाठी ते एक संकट असायचं... पुढे वाचा »

भाषेवर वर्चस्व कुणाचं?

मनोहर राईलकर

‘भाषा आणि जीवन’च्या पावसाळा २००४ (२२:३) च्या अंकात वृषाली देहाडरायांचा ‘गमती भाषेच्या’ अशा शीर्षकाचा लेख आहे. प्रत्यक्षात असं काही असतं का, ह्याबद्दल मला शंका आहे. कारण तशी उदाहरणं घेऊन भाषेवर स्त्रियांचंच वर्चस्व असतं, हे मी दाखवू शकेन. तोच ह्या लेखाचा उद्देश आहे. खरं तर भाषा ह्या शब्दापासूनच ह्या वर्चस्वाची ‘सुरुवात’ होते. (आरंभ होतो, असं मुद्दामच म्हटलं नाही!) पुढे वाचा »