निमंत्रण पत्रिका महाबँक पुरस्कार कार्यक्रम २०१२

शनिवार, दि. २१ जानेवारी २०१२ ला सायंकाळी ठीक ५.३० वाजता धन्वंतरी सभागृह,पटवर्धन बाग, पुणे येथे

मराठी अभ्यास परिषदेचे सर्व सभासद आणि अन्य मान्यवर,

यावर्षीच्या महाबॅंक पुरस्कारासाठी माधुरी पुरंदरे यांनी लिहिलेल्या ‘लिहावे नेटके’ (ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे) या पुस्तकाची निवड केली आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. २१ जानेवारी २०१२ ला सायंकाळी ठीक ५.३० वाजता धन्वंतरी सभागृह,पटवर्धन बाग, पुणे येथे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. रमेश पानसे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला आपण अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती.
सोबत - निमंत्रण पत्रिका पाठवत आहे.

आनन्द काटीकर
कार्यवाह - मराठी अभ्यास परिषद